26.3 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात शनिवारी वारकरी भक्तियोग उपक्रम

पुण्यात शनिवारी वारकरी भक्तियोग उपक्रम

पाच लाखांहून अधिक वारकरी होणार सहभागी

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. २०) पुण्यात पोहोचणार आहे. जागतिक योगदिन शनिवारी आहे. हा योग साधून राज्य सरकारच्या पुढाकाराने यंदा ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ आयोजित केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमात वारकरी, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी, योग अभ्यासक असे १० लाख लोक योग करून त्याचा प्रसार-प्रचार करतील, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी सोमवारी दिली.

याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देविदास वायदंडे, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. धोंडिराम पवार, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते. राज्य सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू, विद्यार्थी विकास मंच यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

पांडे म्हणाले की, मुख्य कार्यक्रम विद्यापीठाच्या इनडोअर सभागृहात २१ जूनला सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होईल. शहरातील २०० हून अधिक महाविद्यालये, पुण्यातील साधारण २५ विद्यापीठे, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR