21.6 C
Latur
Thursday, October 10, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात श्री गणेशोत्सवाची सांगता विसर्जन मिरवणुकीने

पुण्यात श्री गणेशोत्सवाची सांगता विसर्जन मिरवणुकीने

पुणे : प्रतिनिधी
गेले दहा दिवस मंगलमय आणि उत्साही वातावरणात सुरु असणा-या श्री गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी पारंपरिक आणि वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने होणारे आहे. सकाळी साडे दहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहरातील मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील तसेच नेते,कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहणार आहेत.ढोल ताशांच्या गजरात आणि विविध पथकांच्या सहभागात,तसेच बँड पथक नगारा वादन अशा उत्साही वातावरणात मिरवणुकीस सुरुवात होणार आहेत.त्यादृष्टीने कार्यकर्ते मिरवणुकीच्या तयारीत मग्न आहेत.

मिरवणुकीसाठी शहरातील काही गणेश मंडळांनी आकर्षक आणि नयनरम्य देखावे तयार केले आहेत त्यासाठी विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास केली जात आहे.तसेच काही मंडळांनी मिरवणुकीसाठी रथांची सजावट केली आहे.मिरवणुकीसाठी येणा-या नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागात म्हणजेच तेरा ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मिरवणुकीच्या नियोजनासाठी वाहतुकीसाठी शहरातील काही मार्ग बंद करण्यात येणार आहेत. शहरी भागाप्रमाणे उपनगरात आणि पिंपरी चिंचवड भागात मिरवणुकीच्या तयारीत कार्यकर्ते गुंतले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR