पुण्यात हालचालींना वेग

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. पुणे महापालिकेसाठी भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपाचे सूत्र ठरलेले नाही.

शिवसेनेकडून जितक्या जागांची मागणी केली जात आहे, तितक्या सर्वच्या सर्व जागा सोडण्यास भाजपने अद्यापपर्यंत तयारी दर्शवली नाही. यामुळे चर्चेचे गु-हाळ अद्याप सुरूच आहे. त्यामुळे पुण्यासाठी सुरू असलेली जागावाटपातील रस्सीखेच थांबवून तोडगा काढणे गरजेचे आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना शिवसेना शिंदे पक्षाचे रवींद्र धंगेकर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. पुण्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंगची जागा बळकवल्याचा गंभीर आरोप धंगेकरांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणावरून राजकारण तापले होते. अखेर संबंधित व्यवहार रद्द करण्यात आला. पण आता आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून धंगेकरांची कोंडी केली जात असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत.

या कोंडीमुळे रवींद्र धंगेकर मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याचा तयारीत असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून प्रणव धंगेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धंगेकरांनी जागावाटवापरून निवडून न येणा-या जागा भाजप आम्हाला देत असल्याचा आरोप केला असून, नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.

नेमकं काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
शहरामध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर मग निवडणुका कोणासाठी लढवायच्या हा महत्त्वाचा विषय आहे, त्याचबरोबर भाजपने जो प्रस्ताव आमच्या शिवसेनेला दिला आहे, तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, त्यांनी ज्या जागा आम्हाला ऑफर केल्या आहेत, त्या जागेवर कधी भाजपही निवडून आले नाही किंवा शिवसेनाही निवडून आलेली नाही, त्या जागा घेऊन आम्ही काय करणार हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33

Latest news