जळगाव : प्रतिनिधी
दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसतेय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले होते. त्यानंतर आज (३० ऑक्टोबर) रोजी पुन्हा एकदा सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील दहा दिवसांत सोन्याचे दर तब्बल १० हजारांनी घसरले आहेत. तर एक किलो चांदीच्या दरात १३००० रुपयांची घसरण नोंदवली आहे.
३० ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आपण जर मागच्या १० दिवसांचा आलेख पाहिला तर २१ ऑक्टोबर रोजी प्रतितोळा २४ कॅरेट सोन्याची किंमत १३०५८० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी होती. तर, आज सोन्याची किंमत १२०४९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
दरम्यान आज चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. यावेळीही १० दिवसांचा हिशेब पाहिल्यास २१ ऑक्टोबर रोजी १ किलो चांदीची किंमत १६४५०० रुपये इतकी होती. तर, आज १ किलो चांदीची किंमत १५१००० रुपये प्रति किलो आहे. म्हणजेच जवळपास १३००० रुपये किलोंनी चांदीचे दर उतरले आहेत. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १,९१० रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं १,२०,४९० रुपयांवर पोहोचले आहे.
















