23.1 C
Latur
Friday, September 13, 2024
Homeपूजा खेडकर प्रकरणात ट्विस्ट; अपात्र ठरवण्याचा अधिकार ‘युपीएससी’ला नाही!

पूजा खेडकर प्रकरणात ट्विस्ट; अपात्र ठरवण्याचा अधिकार ‘युपीएससी’ला नाही!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
माजी आयएसएस अधिकारी पूजा खेडकरने तिच्यावर होणा-या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. दिल्ली हायकोर्टात पूजा खेडकरने तिचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. माझी उमेदवारी अयोग्य ठरवण्याची कुठलीही शक्ती यूपीएससीला नाही. एकदा प्रशिक्षित अधिकारी म्हणून निवड आणि नियुक्ती झाल्यानंतर उमेदवाराला अपात्र घोषित करण्याचा अधिकार ‘युपीएससी’ला नाही असे पूजा खेडकरने हायकोर्टात म्हटले आहे.

पूजा खेडकरने कोर्टात सांगितले की, माझ्याविरोधात केंद्र सरकारचे कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग कारवाई करू शकतो. २०१२-२२ पर्यंत माझ्या नावात किंवा आडनावात कुठलाही बदल झाला नाही आणि मी यूपीएससीला चुकीची माहिती दिली नाही. यूपीएससीने बायोमेट्रिक डेटाद्वारे माझी ओळख पटवली आहे. आयोगाला माझी सारी कागदपत्रे बनावट आणि बोगस आढळली नाहीत.

तसेच ‘युपीएससी’ने २०१९, २०२१ आणि २०२२ मध्ये व्यक्तिमत्व चाचणीवेळी गोळा केलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे (सायबर आणि फिंगरप्रिंट) माझी ओळख सत्यापित केली आहे. त्यानंतर २६ मे २०२२ रोजी झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीतही आयोगाने सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. मी माझ्या नावातील आणि प्रमाणपत्रांमधील विसंगती दुरुस्त करण्यासाठी शपथपत्रे आणि अधिकृत राजपत्रे देखील सादर केली आणि ‘पीडब्ल्यूबीडी’ (मानदंड अपंगत्व असलेली व्यक्ती), जात आणि वडिलांचे नाव घोषित करण्यासाठी ‘युपीएससी’च्या विनंतीचे पालन केले. त्यामुळे माझे नाव चुकीचे म्हणून दिले असे आयोगाचे म्हणणे चुकीचे आहे असा दावा पूजा खेडकरने केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR