23.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
HomeUncategorizedपॅरासिटॉमॉलसह १५६ औषधांवर केंद्राची बंदी

पॅरासिटॉमॉलसह १५६ औषधांवर केंद्राची बंदी

 

नवी दिल्ली : जी औषधे दोन किंवा अधिक औधषांचे रसायन एका विशिष्ट प्रमाणात वापरून तयार केली जातात, त्यांना एफडीसी म्हटले जाते. सध्या देशामध्ये अशा औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. दरम्यान, ताप, सर्दी, अ‍ॅलर्जी, अंगदुखी, डोकेदुखी यासारख्या किरकोळ आजारांवर उपचार ठरणारी १५६ एफडीसी औषधांवर बंदी घातली आहे.

आता मेडिकल स्टोअर्समधून ही औषधे विकता येणार नाहीत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही औषधे प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याच महिन्याच्या १२ तारखेला प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार सरकारने फार्मा कंपन्यांकडून वेदनाशामक औषधांच्या रूपात वापरण्यात येणा-या एसेक्लोफेनाक ५० एमजी+पॅरासिटामॉल १२५ एमजी टॅबलेटवर बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत रिपोर्टनुसार सरकारने पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिन यांच्या कॉम्बिनेशनवरही बंदी घातली. मल्टीव्हिटॅमिनच्या काही औषधांनाही याच्या चौकटीत आणण्यात आले आहे. एसिक्लेफेनाक ५० एमजी+पॅरासिटामॉलल १२५ टॅबलेटवरही बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या फार्मा कंपन्यांकडून बनवण्यात येणा-या वेदनाशामक औषधांमधील हे प्रसिद्ध कॉम्बिनेशन आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR