पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात आता नवीन वाहन खरेदी करताना ग्राहक केवळ त्याचा लूक किंवा ब्रँड पाहत नाहीत, तर त्या गाडीचा दैनंदिन आणि महिन्याचा खर्च किती येईल, याला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणा-या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रिक व्हेइकल्स हा ग्राहकांसाठी एक स्मार्ट आणि पैसे वाचवणारा उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. विशेषत: तरुण वर्ग, रोज ऑफिसला जाणारे नोकरदार आणि डेली ट्रॅव्हल करणा-या ग्राहकांचा कल आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार खरेदी करण्याकडे वेगाने वाढू लागला आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक एश् खरेदी करताना फार विचार करत होते. मात्र, कमी चार्जिंग खर्च, अत्यंत कमी मेंटेनन्स आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे एश् मार्केट आता भारतीय बाजारपेठेत पाय रोवत आहे. ग्राहकांसाठी हा केवळ एक ‘ट्रेंड’ राहिला नसून, ती काळाची गरज बनली आहे. मुख्यत: शहरांमध्ये दररोज प्रवास करणारे नोकरदार आणि ई-कॉमर्स डिलिव्हरी क्षेत्राशी संबंधित लोक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करत आहेत.

फास्ट चार्जिंगमुळे वाढला विश्वास
सुरुवातीच्या काळात ग्राहकांच्या मनात ईव्हीच्या बॅटरी रेंज आणि चार्जिंग स्टेशनबाबत अनेक शंका होत्या. मात्र, आता हे चित्र वेगाने बदलले आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑटोमोबाईल कंपन्याही नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत आहेत, ज्यामध्ये उत्तम बॅटरी बॅकअप आणि जास्त ‘रेंज’ दिली जात आहे. याशिवाय, मोठया शहरांसोबतच आता प्रमुख हायवेवरही चार्जिंग स्टेशन्सचे जाळे निर्माण झाले आहे, ज्यामुळे लांबच्या प्रवासाची भीती दूर झाली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news