24.6 C
Latur
Tuesday, June 24, 2025
Homeलातूरपोलिसांचा एक हात कर्तव्याचा; एक हात मदतीचा 

पोलिसांचा एक हात कर्तव्याचा; एक हात मदतीचा 

लातूर : प्रतिनिधी
संपूर्ण देशाचे भवितव्य घडविणारी लोकसभेची निवडणुक सद्या सुरु आहे. लातूर लोकसभा मतदारसंघासाठी दि. ७ मे रोजी मतदान झाले.  तापमानाचा पारा ४१ अंशसेल्सिअसवर असतानाही पोलीस यंत्रणा अगदी सकाळपासूनच मतदान प्रक्रियेसाठी दक्ष होती. आपले कर्तव्य बजावत असतानाच पोलीसांनी ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मदत केली. त्यामुळे अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला. पोलिसांचे एक हात कर्तव्याचे होते तर एक हात मदतीचा होता.
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झाले. शंभर टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. वर्षा ठाकुर-घुगे यांनी विविध उपाययोजना केल्या होत्या. उन्हाचा त्रास मतदारांना होणार नाही, यासाठी मतदान केंद्रांवर सावली आणि पाण्याची सोय करण्यात आली होती. तसेच दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही पोलीस दलाला आवश्यक त्या सूचना दिलेल्या होत्या. पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचा-यांनीही दिव्यांग व ज्येष्ठ नागरीक मतदारांना मतदान केंद्रावर मदत केल्याने मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR