नांदेड : प्रतिनिधी
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊनअंतर्गत भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रहार केला आहे. या मोहिमेअंतर्गत तिहेरी हत्याकांडातील साईलाला, शाहरूख उर्फ कबुतर यांच्या गँगसह १२ आरोपींवर ‘मोक्का’ लावून पंख छाटले जाणार आहेत.
शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत ४ एप्रिल रोजी अर्जितसिंगच्या खून प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हे प्रकरण तिहेरी हत्याकांडामुळे गाजले होते. या गँगवॉरमध्ये सहभागी असलेले गुन्हेगार साईसिंग उर्फ साईलाला दीपकसिंग गहेरवार रा. बालाजी मंदिर कमानजवळ सिडको, जयकुमार उर्फ सोनू कैलास राऊत रा. सुमेधनगर नांदेड, शाकेर खान रशीद खान रा. मिल्लतनगर, शेख शाहरुख उर्फ कबूतर शेख अजगर रा.
खुदबईनगर चौरस्ता महबूबिया कॉलनी नांदेड, शेख उबेद शेख अजगर रा. फेमस फंक्शन हॉलजवळ मिल्लतनगर नांदेड, दिग्विजय गणेशराव नारागुडे रा. सावित्रीबाई फुले शाळेजवळ श्यामनगर नांदेड, मन्मथ वसंतराव मंगरुळे रा. नायगाव, नितेश परमेश्वर इंगळे रा. शिवनगर हनुमान मंदिराजवळ, गौरव दीपकसिंग गहेरवार रा. शक्तीनगर, इलियाज उर्फ काला इल्लूखान इस्माईल खान रा. खुदबईनगर चौरस्ता नांदेड या १० जणांसह अर्जित सिंग खुनाच्या घटनेवेळी प्रतिहल्ल्यात मरण पावलेले सय्यद आवेज सय्यद खलील रा. खुदबेनगर चौरस्ता आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख रा. ईदगाह मैदान इतवारा या दोघासह एकूण १२ गुन्हेगारावरील मकोकाचा प्रस्तावनांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
















