पोलिस जमादाराचा मृत्यू; अपघात की घातपात?

- Advertisement -

परभणी : पोलिस मुख्यालयातील बँड पथकात जमादार म्हणून कार्यरत असलेल्या गंगाधर राणाप्रताप शिंदे यांचा परभणी ते जिंतूर मार्गावरील झरी ते कोक दरम्यानच्या माक पाटीजवळ मृतदेह आढळून आला.

ही घटना रविवार, दि.३ मे रोजी पहाटे उघडकीस आली. जमादार शिंदे हे दुचाकीवरून जिंतूर येथून परभणीकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी हा अपघात की घातपात याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान ग्रामिणचे सपोनि. जीवन राजगुरू यांच्यापुढे या घटनेच्या तपासाचे मोठे आव्हान उभे राहीले आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार जमादार शिंदे (वय ४० रा. त्रिमुर्तीनगर, परभणी) हे पोलिस मुख्यालयातील बँड पथकात बिगुल वाजविण्याचे काम करीत होते. रविवारी पहाटे २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास ते जिंतूर येथून परभणीकडे दुचाकी (क्र. एमएच २२ वाय ९८७८) वरून येत होते. या रस्त्यावरील माक पाटीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी स्थानिक नागरिकांना शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामिण उपविभागीय पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे, ग्रामिण पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू, पोउपनि. कुंडलीक मोहिते, सपोउपनि. भरत तावरे, पोशि. नवनाथ लोणसे, बीट जमादार सुधीर डोंबे व अन्य अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी पंचनामा करून जमादार शिंदे यांचा मृतदेह परभणी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान वृत्त लिहेपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. दरम्यान जमादार शिंदे यांचा मृत्यू संशयास्पद अपघाती मृत्यू झाल्याने अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करीत आहेत. शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात परभणी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या वर्षी सोडलं जग

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46
Video thumbnail
लातूरच्या RCC क्लासवर CBI ची पुन्हा कारवाई; संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
03:44
Video thumbnail
NTA समिती बरखास्त करा आणि RCC क्लासेसचे शुल्क परत करा; संतप्त लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
04:08
Video thumbnail
नीट प्रकरणी लातुरातून दोन विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी, गुरुवारी पुण्यात हजर राहण्याचे आदेश1
04:08
Video thumbnail
मुक्कामी बसच्या प्रवाशांना अंधाराचा सामना; तावशीगड येथील मुख्य चौकात 'बत्ती गुल'!
01:51
Video thumbnail
MNS PROTEST|लातूर : RCC क्लासेसवर मनसेचे अंडेफेक आंदोलन
01:09
Video thumbnail
RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर अभाविप आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाचा ईशारा
02:51
Video thumbnail
कर्नाटकात दुर्घटना! दुबारे कॅम्पमध्ये दोन हत्तींमध्ये थरारक झुंज; ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू
00:23
Video thumbnail
प्रा. मोटेगावकरांच्या अटकेमागे 'हा' व्हिडिओ कारणीभूत; तपासाला वेग.
01:00
Video thumbnail
Shivraj Motegavkar Arrest|प्रा. शिवराज मोटेगावकरांना १० दिवसांची CBI कोठडी;ईडीचीही एन्ट्री
02:45
Video thumbnail
Shivsena Protest|NEET पेपरफुटीवर शिवसेना आक्रमक;RCC क्लासेसवर शिवसेनेकडून शाहीफेक
03:33
Video thumbnail
Latur|पिक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक;विमा कंपनी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव
06:11