31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeलातूरपोहरेगाव जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात

पोहरेगाव जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात

पोहरेगाव : वार्ताहर
जिल्हा परिषद पोहरेगाव आणि पंचायत समिती निवाडा-पोहरेगाव गण याच्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ रविवार २५ जानेवारी रोजी डिघोळ (ता. रेणापूर) येथील ग्रामदैवत सोमलिंगेश्वर यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणाचे माजीं चेअरमन सर्जेराव मोरे होते तर मंचावर प्रमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, रेणाचे संचालक स्रेहल देशमुख, माजी सभापती रमेश सोनवणे, सुभाष गायकवाड संचालक डॉ.उमाकांत देशमुख, गोविंद देशमुख,लालासाहेब देशमुख, विठ्ठल देशमुख, रावसाहेब देशमुख, गंगासिंह कदम, अजिंक्य कदम, उत्तम राठोड, शिवाजी माने, बदाम माने, अण्णा माने, सोमनाथ बन, प्रवीण पवार, शालिवाहन सरवदे, दशरथ केसरे, बालासाहेब यादव हे उपस्थित होते.

काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करण्याचीं संधी देणारा पक्ष आहे. आज काँग्रेसचे नेते सरकारमहर्षी दिलिपराव देशमुख, आ. अमित देशमुख, बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूरचे नाव सहकार, बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्रात दिमाखाने सुरु आहे. सध्या होत असणा-या जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाचीं सत्ता आणणे काळाची गरज असून भाजपचे धोरण अडमुठी असल्याचे गंगासिंहकदम यांनी बोलताना सांगतिले. माझ्यासारंख्या सर्वंसामान्य व्यक्तीला उमेदवारी मिळणे हे फार आनंदाची गोष्ट असून हे फक्त काँग्रेसमध्येच शक्य असल्याचे पंचायत समितीचे उमेदवार तात्या वाघमारे यांनी सांगितले. शिवाय पोहरेगाव हा मागील २५ वर्षांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो आपल्या सर्वांना ताकदीने शाबूत ठेवून जिल्हा परिषदेत काँगेसचीं एकहाती सत्ता आणायचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डिघोळ देशमुख परिसरातील काँग्रेस पदाधिकारी आणि असंख्य कार्यककर्त्यांचीं उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR