Homeलातूरपोहरेगाव येथे उद्या मोफत कर्करोग निदान शिबिर

पोहरेगाव येथे उद्या मोफत कर्करोग निदान शिबिर

रेणापूर  : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे युवा नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष  तथा माजी आमदार  धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील पोहरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्या सौ. मनिषा कदम यांच्या पुढाकारातून सोमवार दि ६ एप्रील रोजी ‘मोफत कर्करोग (कॅन्सर) निदान शिबिराचे’  आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत  हे शिबीर होणार आहे.
या शिबीरासाठी लातूर येथील ‘गडदे हॉस्पिटल अँड कॅन्सर केअर’चे तज्ज्ञ डॉक्टर डॉ .एच. एस. गडदे हे रुग्णांची मोफत तपासणी करून योग्य  मार्गदर्शन व सल्ला देणार आहेत. या शिबिरात प्रामुख्याने तोंडात न बरे होणारे व्रण, शरीरावर किंवा स्त्रियांच्या बाबतीत स्तनांमध्ये जाणवणारी गाठ, अन्न गिळताना होणारा त्रास, सततचा खोकला, आवाजातील बदल, चामखीळ किंवा तिळाच्या रंगात होणारा बदल, तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध तक्रारींचे निदानही या शिबीरातून केले जाणार आहे. तेव्हा पोहरेगाव व परिसरातील  नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून या शिबीरांचा  लाभ घ्यावा, असे आवाहन जि. प. सदस्या सौ. मनिषा कदम व माजी सरपंच गंगासिंह कदम यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR