पौष्टिक ड्रायफ्रुट १५ टक्क्यांनी महागले

लातूर : प्रतिनिधी
शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या पौष्टीक ड्रायफ्रुटच्या मागणीत गतवर्षाच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती किरकोळ व्यापारी सादिक बागवान यांनी दिली. वाढत्या थंडीमुळे ड्रायफ्रुटची मागणी वाढली तसे दरही वाढले आहेत. शहरातील किरकोळ बाजारात काही दिवसापांसून काजू, बदाम, अक्रोडच्या मागणीत वाढ झाली आहे.
सध्या बाजारात कोल्हापूर, मंगळुरु, गोवा, केरळ येथून काजूची आवक होत आहे तर बदामाची आवक अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून होत आहे. तसेच इराणमधील मॉमेरोन जातीच्या बदामाची आवक होत आहे. काजूच्या नवीन हंगामाची सुरुवात झाली असून त्याला मागणीही चांगली आहे. त्याच बरोबर अक्रोडची आवक दक्षिण अमेरिकेतील चिलीतून होत आहे. अमेरिकेतून अक्रोडची आवक होत असली तरी चिलीच्या अक्रोडची प्रतवारीही चांगली आहे.
 पुढील काही दिवसांत काश्­मीरमधील अक्रोडचा हंगाम सुरू होईल. गतवर्षाप्रमाणे थंडीत ड्रायफ्रुटच्या मागणीत वाढ होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत ड्रायफ्रुटला चांगली मागणी राहते, असेही त्यांनी सांगितले. हिवाळयात आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारवरही लक्ष केंद्रीत केले जाते. हिवाळा या मोसमात जीममध्ये जाणा-यांची संख्या वाढत असते. व्यायामासोबत पोषक असा आहार घेण्यासाठी डिंक, शेंगदाणे आदींपासून तयार केलेले लाडूंचा वापरही मोठया प्रमाणात केला जातो. हे पदार्थ बनविण्यासाठी ड्रायफ्रुट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ता, खारिक, खोबरे आदींना प्रचंड मागणी असते. गतवर्षाच्या तूलनेत यंदा थंडीची लाट वाढत जात आहे. त्याच प्रमाणे ड्रायफ्रुटच्या मागणीत वाढ होत असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
हिवाळा ऋतूतील हवामान पचन शक्तीसाठी पुरक असल्याने अनेक नागरिक आरोग्यासाठी ड्रायफ्रुट खातात. यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पस्तिा, खारिक, खजूर, मनुका असे अनेक पदार्थ असतात. गत महिनाभरात ड्रायफ्रुट आणि पौष्टिक लाडूंच्या मागणीत दुपटीने वाढ झाल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले आहे. दीपावलीपासून थंडीला सुरुवात झाल्याने या थंडीच्या दिवसांत शरीरासाठी पौष्टिक पदार्थ खावेत, असा सला डॉक्टरही देत असतात. महिनाभरापासून लातूर बाजारपेठेत विविध प्रकारचे ड्रायफ्रुट तसेच डिंकाचे लाडू, काजू, किसमीस, खजूर, खारीक, खोबरे, मनुका यांची आवक मोठया प्रमाणात होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news