25.8 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeसोलापूरप्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचे ठेकेदाराकडून काम बंद

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचे ठेकेदाराकडून काम बंद

पंढरपूर : पंढरपूर शहरात ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेंतर्गत शहराती सर्व्हे नं. १७/ ब या ठिकाणी (एपीएच) या घटका अंतर्गत २०९२ घरकुले बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम पुरेशा निधीअभावी बंद पडलेले आहे. ठेकेदार काम करायला तयार नाही. लाभार्थी नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र आश्वासनानंतर काहीच मिळालेले नाही. दिवाळीत घरे मिळण्याची आशा लाभाथ्यांना होती. मात्र, मिळाली नसल्याने लाभाध्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर नगरपालिकेकडून सांगण्यात येते की, प्रधानमंत्री आवास’ योजनेंतर्गत या प्रकल्पातील मंजूर लाभार्थ्यांनी त्यांचे स्वहिश्याची देय असलेली रक्कम भरलेली नाही. त्यामुळे ठेकेदाराने काम थांबवले आहे. काम सुरु होण्यासाठी लाभार्थ्यांनी पैसे भरणे आवश्यक आहे.

‘प्रधानमंत्री आवास’ योजने अंतर्गत प्रकल्पातील मंजूर लाभाथ्यांना त्यांचे स्वहिश्याची देय असलेली रक्कम भरावी म्हणून यापूर्वीच सांगण्यात आलेले आहे. परंतु बहुतांश लाभार्थ्यांनी अद्यापही स्वहिश्याची रक्कम भरलेली नाही. लाभार्थ्यांकडून स्वहिश्याची रकम न भरल्यामुळे रोकड प्रवाह नियमित न राहिल्याने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उभारण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या जागेवर झालेल्या घरकूल कामापोटी २५. १६ कोटी बिलाची मागणी केलेली आहे. केलेल्या कामाची बिले शासनाकडून प्राप्त ११.२६ कोटी निधीतून अदा करण्यात आलेले आहेत.

उर्वरित कामाचे बिल न मिळाल्याने प्रधानमंत्री आवास योजनेचे काम ठेकेदाराने बंद केले आहे. उलट बिलाची रक्कम मिळावी, म्हणून पंढरपूर नगरपरिषदेलाच ठेकेदाराने कायदेशीर नोटीस दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सद्यः स्थितीत प्रकल्पाचे काम चालू करण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या स्वहिश्याची रक्कम १३ कोटी रुपये भरणे आवश्यक आहे. तरच काम पुढे सुरु होऊ शकते. अन्यथा हा प्रकल्प बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही योजना कार्यान्वित व्हावी, लाभाथ्यांना त्यांची हक्काची घरे मिळावीत, यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करण्याची गरज असल्याची भावना लाभार्थी व्यक्त करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR