चाकूर : प्रतिनिधी
मंदोदरी आप्पासाहेब वाकडे-निकम या सध्या चाकूर पंचायत समीतीत गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या येथे आल्यापासून शिक्षण विभागाला चांगलीच शिस्त लागली आहे. प्रसंगी मृदु तर कांही प्रसंगी कठोर होऊन त्या प्रशासनावर पकड ठेवतात.
त्यांची चाकूर येथे दिंनाक ३१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने चाकूर पंचायत समीतीला गटशिक्षणाधिकारी म्हणुन धारणी येथून बदली केली. त्या दिनांक २ जुन २०२५ पासुन चाकूर पंचायत समीतीला गटशिक्षणाधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. त्यांच्या या काळात चाकूर पंचायत समिती क्षेत्रात शिक्षणाचा दर्जा सुधारला असून त्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. या क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषदेच्या शाळा आणि तिथे सेवा करणारे शिक्षक यांनी या शैक्षणिक प्रगतीत सहभागी होऊन योगदान दिलेले आहे.
मंदोदरी वाकडे-निकम यांचे शिक्षण बी.ई.कॉंप्युटर सायन्सची पदवी पुणे येथील एमआयटी कॉलेज ऑफ ईजिनियरींग मधुन प्राप्त केली आहे. त्यांचे मूळगाव- मंगळवेढा, जि. सोलापूर, सासर कासार जवळा, ता. जि. लातूर असून २०१८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची निवड राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक म्हणून झाली होती. त्या मुंबई येथे मंत्रालयात वित्त विभागामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत २०१९ ते २० २२ तीन वर्ष कार्यरत होत्या. मंत्रालयात वित्त विभागात काम करताना प्रशासनाचा एक वेगळा पैलू पाहिला, तिथे फाईल्सची शिस्त होती. नंतर त्यांनी परत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली आणि त्यांची निवड उपशिक्षणाधिकारी म्हणुन झाली. त्यांची पहिली पोस्टींग मेळघाटातील पंचायत समिती धारणी, जि. अमरावती येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून झाली तेथे शिक्षण विभागात चांगल्या पध्दतीने कार्य करून शिक्षणात गुणवत्ता निर्माण करण्यांचे काम केले आहे.
मेळघाटातील धारणी (जि. अमरावती) येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवा करताना आवाहाने काय असतात याची ओळख झाली. तसेच मंत्रालय ‘धोरण’ बनवतं आणि पंचायत समिती स्तरावर त्या धोरणांची ‘अंमलबजावणी’ कशी होते, हे त्यांना जवळून पाहता आलं. सध्या मंदोदरी आप्पासाहेब वाकडे -निकम या चाकूर पंचायत समीतीला गटशिक्षणाघिकारी म्हणुन सेवारत आहेत. त्यांनी महिला दिना निमित्त महिलांना स्वत:च्या स्वप्नांशी कधीही तडजोड करू नका. एका हातात पाळण्याची दोरी आणि दुस-या हातात प्रशासकीय जबाबदारी लीलया पेलण्याची ताकद निसर्गाने फक्त आपल्यालाच दिली आहे. आपण केवळ घराचे नाही, तर समाजाचेही ‘पालक’ आहोत. असा संदेश दिला आहे.

