लातूर : प्रतिनिधी
राजमाता जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संगमेश्वर केंद्रे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा लातूरच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानाचा ‘लातूर भूषण’ पुरस्कार गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, विद्यानंद सागर महाराज, पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे, आमदार अभिमन्यू पवार, राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, उपप्राचार्य कविता केंद्रे, राजेंद्र जायेभाये, मुख्याध्यापिका अश्विनी केंद्रे, समन्वयक राजीव मुंढे, प्राचार्य जी. आर. मुंडे, राणी केंद्रे यांच्यासह संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
















