लातूर : प्रतिनिधी
येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालयातील मराठी विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बालाजी शिंदे यांनी भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाकडे ‘मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती’ या विषयावरील कलाकृतीचे सादरीकरण केले होते. त्यांच्या या नावीन्यपूर्ण सृजनशील कलाकृतीसाठी भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाकडून कॉपीराईट मंजूर करण्यात आले व अधिकृत कॉपीराईट प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे. डॉ. बालाजी शिंदे व यादव मोरे यांनी केलेले संशोधन मराठी भाषा शिकण्यासाठी व संवादाच्या सुलभतेसाठी उपयुक्त ठरणार आहे. या यशाबद्दल तालमणी डॉ. राम बोरगावकर, प्राचार्य डॉ. पांडुरंग गोरे, प्रा. डॉ. वसंत बंडे, प्रा. रवि चव्हाण, डॉ. सुदाम पवार, प्रा. तुकाराम येमले, प्रा. श्रीमंत दोरवे, शशिकांत सोळुंके, डॉ. संतोष कुलकर्णी, प्रा. अमोल जाधव, डॉ. मोनालिसा खानोरकर, कोंडीराम कागले यांनी अभिनंदन केले.
















