लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूरच्या वतीने दि. २३ एप्रिल रोजी दयानंद सभागृहात आयोजित शिक्षक परिषदेत प्रा. नाजेमा अब्बास शेख यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय जिल्हा स्तरीय पदाधिकारी यांची उपस्थिती होती. प्रा. नाजेमा शेख यांचा सन्मान हा त्यांच्या शिक्षणातील उत्कृष्ट योगदान, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा आणि समाजाभिमुख कार्य यांची दखल घेऊन देण्यात आला आहे.

