सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील बार्शी येथे मेहुण्याने भाऊजीची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे प्रेमविवाहाला विरोध केल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. शिवाय या घटनेतील आरोपी ऋषिकेश क्षीरसागर हा अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशील क्षीरसागर आणि ऋषिकेश यांची बहीण रेश्मा हिचा प्रेमविवाह एक वर्षापूर्वी झाला होता. घरातील काही सदस्यांना हे लग्न मान्य नव्हते. सुशील आणि रेश्मा कामानिमित्ताने पुणे येथे स्थायिक झाले होते. त्यानंतर २३ जानेवारी रोजी कार्यक्रम असल्यामुळे सुशील आणि रेश्मा हे येरमाळा येथे आले होते.
बुधवार, २८ जानेवारी रोजी बार्शीतील पांगरी येथील एका हॉटेलमध्ये सायंकाळी साडेआठच्या सुमारास सुशील, रेश्मा आणि ऋषिकेश यांच्यासह घरातील मंडळी जेवणासाठी गेले होते. त्यावेळेस सुशील आणि ऋषिकेश यांचं कडाक्याचं भांडण झालं आणि त्यातून ऋषिकेशने सुशीलच्या डोक्यात बाटली फोडून वार करत ठार केले.

