नागपूर : प्रतिनिधी
नैराश्यातून आत्महत्या करणा-या प्रेयसीच्या सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाला नातेवाईकांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी ९ जून रोजी सायंकाळी कामठीतील कन्हान नदीच्या शांती घाटावर घडली आहे. मारहाणीनंतर बेशुद्ध झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, प्रेयसीच्या मृत्यूनंतर व्यथित झालेल्या तरुणाने थेट तिच्या सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी अन्त्यसंस्काराला आलेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी चितेवर उडी मारणा-या तरुणाला जबर मारहाण केली.
कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमभंगाने निराश झालेल्या तरुणीने आत्महत्येचे पाऊल उचलले. तिच्यावर अन्त्यसंस्कार सुरू असतानाच अचानकपणे तरुण त्या ठिकाणी आला. त्याने सरणावर उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथे हजर असलेल्या लोकांनी त्या तरुणाला चोप दिला. तरुणाला लोकांच्या मदतीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत.