26.4 C
Latur
Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्रफडणवीसांना ‘आशिकी’ची भुरळ!

फडणवीसांना ‘आशिकी’ची भुरळ!

नागपूर : प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार, नेते सध्या नागपुरात मुक्कामी आहेत. अधिवेशन संपल्यानंतर काहीसा विरंगुळा व्हावा, म्हणून भाजपचे आमदार मंगलप्रसाद लोढा यांनी मंगळवारी रात्री हुरडा पार्टीचे आयोजन केले होते. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हुरडा पार्टी गाजवली.

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सलग दुस-यांदा मंगलप्रसाद लोढा यांनी ही हुरडा पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला सर्वपक्षीय आमदार, नेत्यांना लोढांनी निमंत्रण दिले होते. विविध पक्षांतील आमदार, मंत्री आणि नेते या पार्टीला उपस्थित होते. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी सुरात-सूर मिसळले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी व्यासपीठावर ‘एक दिन मिट जायेगा माटी के मोल’ हे गाणे म्हटले. त्यांनी उपस्थित आमदार, नेत्यांची मने जिंकली. नार्वेकरांचे गाणे संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायक कुमार सानू यांच्या गाण्याची फर्माईश केली. ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्याची फर्माईश मुख्यमंत्र्यांनी केली. कार्यक्रमात नव्वदच्या दशकातील गाण्याची फर्माईश मुख्यमंत्र्यांनी केली.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने सुयोग प्रांगण, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित या ‘हुरडा पार्टी’ कार्यक्रमात राजकारणासोबत विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. एकमेकांशी संवाद साधत आणि पारंपरिक हुरड्याचा आस्वाद घेत पार्टीचा आनंद लुटला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR