मुंबई : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले ट्विट चर्चेत आहे. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, असे विधान केले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी हा विषय शिकवण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून सध्या राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तीव्र झालेल्या मराठी-हिंदी भाषा वादावरून केलेल्या सूचक ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांना खूपच धूर्त म्हणावे लागेल.
प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि विरोधी पक्षाला खेळवतात. मागच्या अधिवेशनात झटका की हलाल आणि औरंगजेबाची कबर हे विषय होते. या वेळी हिंदी भाषेचा विषय पुढे करून विरोधी पक्षाला गुंतवून ठेवणार. म्हणजे कोणीच खरे प्रश्न विचारायला नको.
प्रत्येक अधिवेशनाआधी एक पासा फेकतात आणि विरोधी पक्षाला खेळवतात. मागच्या अधिवेशनात ‘झटका की हलाल’ आणि ‘औरंगजेबाची कबर’ होती. या वेळी ‘हिंदी भाषेचा’ विषय पुढे करून विरोधी पक्षाला गुंतवून ठेवणार. असे दमानिया म्हणाल्या.