20.9 C
Latur
Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीस, गडकरी त्यांच्या मनाप्रमाणे वागतात

फडणवीस, गडकरी त्यांच्या मनाप्रमाणे वागतात

नागपूर : प्रतिनिधी
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपश्रेष्ठी ज्या नावाला पसंती देतील, ते मला मान्य राहील. माझ्याशिवाय दुसरा उमेदवार दिल्यास त्याच्यासाठी काम करेल, अशी ग्वाही मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी मोठे नेते आहेत, ते त्यांच्या मनाप्रमाणे चालतात, त्यामुळे मध्य नागपूर संदर्भात ते जे निर्णय करतील तो मान्य राहील, असे सूचक वक्तव्यही विकास कुंभारे यांनी केले आहे.

विशेष म्हणजे मध्य नागपूरमध्ये हलबा समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत. त्यामुळे भाजपने हलवा उमेदवार द्यावा, की दुस-या समाजाचा उमेदवार द्यावा, हा निर्णय पक्षश्रेष्ठींनी करावा असेही कुंभारे म्हणाले.

८ विद्यमान आमदार अजूनही वेटिंगवर
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्ह्याच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. विदर्भात भाजपचे आमदार असलेल्या नागपूर मध्य, आर्णी, उमरखेड, गडचिरोली, अकोला पश्चिम, आकोट, मूर्तिजापूर, आर्वी, कारंजा आणि वाशिम या १० मतदारसंघांत भाजपचे आमदार असतानाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यापैकी ८ ठिकाणी विद्यमान आमदारांना भाजपने वेटिंगवर ठेवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR