Homeराष्ट्रीयफारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार, बालंबाल बचावले

फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार, बालंबाल बचावले

जम्मू : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यावर जम्मूमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. सुदैवाने या हल्ल्यात फारूक अब्दुल्ला थोडक्यात बचावले. ही घटना जम्मूतील ग्रेटर कैलाश परिसरात घडली. फारूक अब्दुल्ला त्यांच्या परिचयाच्या एका वकिलाच्या मुलाच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

फारूक अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करणा-या आरोपीला सुरक्षा रक्षकांनी पकडले आहे. कमलसिंह जमवाल असे त्याचे नाव असून पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतले आहे. हल्ल्यानंतर आरोपी झुडुपांमध्ये लपून बसला होता. मात्र, सुरक्षा कर्मचा-यांनी त्याला पकडले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेच्या वेळी फारूक अब्दुल्ला यांच्यासोबत जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील उपस्थित होते. गोळीबारादरम्यान त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR