28.7 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeअंतरराष्ट्रीयफेरी बोट समुद्रात बुडाली; चौघे मृत्युमुखी, ३८ बेपत्ता

फेरी बोट समुद्रात बुडाली; चौघे मृत्युमुखी, ३८ बेपत्ता

बाली (इंडोनेशिया) : वृत्तसंस्था
इंडोनेशियाच्या जावा बेटावरून बालीकडे निघालेली एक फेरी बोट बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास समुद्रात बुडाल्याने किमान चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३८ जण अद्यापही बेपत्ता आहेत. आत्तापर्यंत २३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

फेरीवर एकूण ६५ लोक होते, त्यात ५३ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते, असं फेरीच्या मॅनिफेस्टमध्ये नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वेळा जास्त प्रवासी असतात.फेरी बुडण्याचे कारण वाईट हवामान असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. ही घटना फक्त २५ मिनिटांत घडली, असंही बचाव यंत्रणांनी स्पष्ट केले.

बचाव पथकांनी खवळलेला समुद्र आणि २.५ मीटर (८ फूट) उंच लाटा, जोरदार वारे आणि प्रवाहांमुळे अडथळा येत असतानाही शोधकार्य सुरू ठेवलं आहे. प्रारंभी खराब हवामानामुळे मदतकार्याला विलंब झाला, मात्र आता हवामान काहीसे सुधारले आहे, असे स्थानिक बचाव यंत्रणांनी सांगितले.

बोट जावा बेटावरील बान्युवांगी येथून गिलिमानुक, बाली येथे जात होती. हा सुमारे ५ किमीचा प्रवास असून, साधारणत: एका तासात पूर्ण होतो. ही फेरी वाहने घेऊन जाणारी असून, त्यात २२ वाहने होती, त्यापैकी १४ ट्रक होते. बचावलेल्यांपैकी चार प्रवाशांनी स्वत: फेरीवरील लाईफबोटचा वापर करून आपला जीव वाचवला आणि त्यांना गुरुवारी सकाळी पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. या जहाजाला ६७ लोक आणि २५ वाहने वाहून नेण्याची परवानगी होती, असे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR