फॉरेन्सिक टीमने गोळा केले रंगाचे नमुने

मुंबई : प्रतिनिधी
दादरच्या शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर बुधवारी (१७ सप्टेंबर) सकाळी ६ नंतर रंग फेकून विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उपेंद्र गुणाजी पावसकर याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास करत आहेत. यानंतर आता फॉरेन्सिक टीमने देखील रंगाचे नमुने गोळा केले आहेत.

दादरच्या शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर बुधवारी सकाळी रंग फेकून विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे. हे वृत्त वा-­यासारखे पसरताच शिवसैनिक आणि मनसैनिकांनी शिवाजी पार्क परिसरात धाव घेऊन पुतळा तसेच परिसराची स्वच्छता केली. या घटनेमुळे दादरमध्ये तणाव निर्माण झाला होता. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर ताबा मिळवला. यानंतर रात्री उपेंद्र गुणाजी पावसकर याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. तसेच अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. अशातच फॉरेन्सिक टीमने रंगाचे नमुने गोळा केले आहेत.

शिवाजी पार्क परिसरात नेहमीप्रमाणे नागरिक मॉर्निंग वॉक करीत असताना मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना सकाळी समोर आली. या घटनेनंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महादेव देवळे, उपनेत्या विशाखा राऊत, विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आदी नेतेमंडळी उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसैनिकांनी त्वरित पुतळ्याची साफसफाई केली.

दरम्यान, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे समजताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पुतळ्याच्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली. तसेच घटनास्थळी पोहोचल्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news