23.8 C
Latur
Wednesday, March 11, 2026
Homeअंतरराष्ट्रीयबँकेतील नोटा घेऊन जाणारे विमान कोसळले; १५ ठार

बँकेतील नोटा घेऊन जाणारे विमान कोसळले; १५ ठार

बोलिव्हिया – बोलिव्हियाच्या राजधानीजवळ शुक्रवारी पैसे घेऊन जाणारे एक मालवाहू विमान कोसळले. त्यामुळे महामार्गावरील सुमारे १२ वाहनांचे नुकसान झाले. विमान कोसळल्यानंतर नोटा जमिनीवर विखुरल्या गेल्या होत्या. या अपघातात १५जणांचा मृत्यू झाला. यात अनेकजण जखमी झाले आहेत.
पंधरा जणांचा मृत्यू – ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळी बोलिव्हियाची राजधानी ला पाझजवळील एल अल्टो शहरात खराब हवामानामुळे एक विमान कोसळले. देशाच्या मध्यवर्ती बँकेतून नवीन नोटा घेऊन जाणारे बोलिव्हियन एअर फोर्स हर्क्युलस विमान एका वर्दळीच्या रस्त्यावर कोसळल्याने पंधरा जणांचा मृत्यू झाला. यात किमान ३० जण जखमी झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडीओनुसार, विमानाने ला पाझला लागून असलेल्या एल अल्टो शहरात वाहनांना धडक दिली आणि नंतर ते एका शेतात कोसळले. विमान कोसळले तेव्हा ते उड्डाण करत होते की लँडिंग करत होते याबद्दल परस्परविरोधी वृत्त आहे.

कोसळल्यानंतर विमानाला लागली आग
विमानातील सामान, गाड्यांचा झालेला चुराडा आणि मृतदेह रस्त्यावर पडले होते. किमान १२ वाहने या विमानाखाली दबली गेली. विमानाला लागलेली आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. बोलिव्हियन हवाई दलाचे हे विमान सेंट्रल बँकेतून इतर शहरांमध्ये नवीन नोटा घेऊन जात होते. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात नोटा जमिनीवर विखुरल्या होत्या. समोर आलेल्या व्हीडीओनुसार, विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी नोटांचा खच साचला होता. या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, घटनास्थळी पोलिसांनी कडक सुरक्षा तैनात केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR