लातूर : प्रतिनिधी
गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार बनावट देशी मद्याचा व परराज्यातील विदेशी मद्याचा साठा असल्याचे समजल्याने जिल्ह्यातील मौजे पानगाव ता. रेणापूर जि. लातूर येथील एका इसमाच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता देशी दारू भिंगरी संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या एकूण ४ हजार ३०० बॉटल प्रथमदर्शनी बनावट मिळून आल्या व गोवा राज्यातील १८० मि.ली. क्षमतेच्या ३ हजार ५५२ विदेशी मद्याच्या सिलबंद बाटल्या तसेच अवैध मद्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेले दुचाकी मोटार सायकलसह एकूण मुददेमाल किंमत ११ लाख ६१ हजार ८८० रुपयांचा मुद्येमाल जप्त करून ४ आरोपी इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत दाखल करून सदर इसमाना जागीच अटक करण्यात आली.
गुरुवार दि.१५ रोजीच्या मध्यरात्री मा.डॉ. राजेश देशमुख आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे, सहआयुक्त अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच नांदेड विभागाचे विभागीय उप-आयुक्त बी. एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत, लातूर व उपअधीक्षक एम. जी. मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार बनावट देशी मद्याचा व परराज्यातील विदेशी मद्याचा साठा असल्याचे समजल्याने मौजे पानगाव ता. रेणापूर जि. लातूर येथील एका इसमाच्या पत्रीशेडमध्ये छापा टाकला असता देशी दारू भिंगरी संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या एकूण ४ हजार ३०० बॉटल प्रथमदर्शनी बनावट मिळून आल्या व गोवा राज्यातील १८० मि.ली. क्षमतेच्या ३ हजार ५५२ विदेशी मद्याच्या सिलबंद बाटल्या तसेच अवैध मद्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेले दुचाकी मोटार सायकलसह एकूण मुद्येमाल किंमत रू.११ लाख ६१ हजार ८८० रुपयांचा मुद्येमाल जप्त करून तपासात ४ आरोपीत इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गु.र.नं. ५/२०२६ व ०६/२०२६ दि.१६/०१/२०२६ दाखल करून सदर इसमाना जागीच अटक करण्यात आली.
सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क चाकूर विभागाच्या निरीक्षक श्रीमती यु. व्ही. मिसाळ, दुय्यम निरीक्षक आर. एम. माकोडे, एस. आर. राठोड, एस. के. वाघमारे तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क निलंगा विभागाचे दुय्यम निरीक्षक सर्वश्री एस.डी. घुले, एस.पी. काळे, तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी.आर. होळकर व जवान सर्वश्री ए.ए.देशपांडे, बी.ए. गायकवाड, बी.एस. साखरे, आर.एस. चिंचोलीकर यांनी सहभाग नोंदविला. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती यु.व्ही.मिसाळ निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चाकूर व आर. एम. माकोडे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चाकूर-१ हे करत आहेत.

