धुळे : प्रतिनिधी
निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गारपिटीमुळे रबी पिकांचे कंबरडे मोडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे. निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी धुळे जिल्ह्याच्या साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला.
सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गारपिटीमुळे रबी पिकांचे कंबरडे मोडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे.
शेणपूर, मलांजन, सामोडे आणि कासारे परिसरात पावसाने रौद्र रूप धारण केले. शेणपूर येथील डाळिंब उत्पादक आकाश काकुस्ते यांच्या ७ एकर क्षेत्रातील बागेचे अतोनात नुकसान झाले आहे.
गारांच्या मारामुळे डाळिंबाची फुले व फळे गळून पडली असून, आगामी काळात ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच कासारे येथील विकास देसले यांच्या शेतातील टरबूज व पपईच्या पिकात पाणी साचल्याने नुकसान झाले.
मालपूर यात्रेवर निसर्गाचा घाला पडला आहे. नदीपात्रात उभारलेली तात्पुरती हॉटेल्स, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने वादळी वा-याने जमीनदोस्त झाली. अनेकांचे साठवलेले खाद्यान्न आणि विक्रीचे साहित्य पावसात भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शासनाने तातडीने पंचनामे करावेत!
साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात बुधवारी झालेल्या भीषण गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे. शेणपूर येथील ७ एकर डाळिंब बागेसह कासारे परिसरातील टरबूज व पपईची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

