23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeलातूरबाजार समितीकडून घटकांना सुविधा उपलब्ध करून देणार

बाजार समितीकडून घटकांना सुविधा उपलब्ध करून देणार

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर कृषि उत्पन्न बाजार समिती सर्व घटकांना सामावून घेवून कार्य करीत असून घटकांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास व्यक्त करत लातूर बाजार समिती नफ्यात आणली अशी माहिती लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांनी सांगितले. लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा दगडोजीदादा देशमुख सभागृहात शनिवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र बाजार समिती संघाचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी, चंद्रकांत पाटील, पांडुरंग मुंदडा, तुळशीराम गंभीरे, बालाजी जाधव, बाजार समितीचे सचिव अरविंद पाटील उपस्थित होते.

बाजार समितीत पिण्यासाठी पाणी आरो उपलब्ध करून दिला तर रेशीम उत्पादकांसाठी सुसज्ज गोडाऊन बाधून देण्यात आल्याचे सांगून बावणे म्हणाले की, बाजार आवारातील सुसज्ज रस्ते, पशू शिबिर यासह विविध योजना राबविल्या जात असुन यासाठी आवश्यक सहकार्य सर्वाचे मिळत असल्याने या भागात विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सर्वसाधारण सभेत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. दीपप्रज्वलन करून सभेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी संतोष सोमवंशी यांनी लातूरच्या बाजार समितीने अतिशय चांगले कार्य करीत आज राज्यात नावलौकिक मिळविला आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांच्यापासून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सक्ष्मपणे कार्यरत असून शेतक-यांना विविध योजना राबवून सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल बाजार समितीचे कौतुक केले.

यावेळी विविध विषयाचे वाचन करून सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पडिले, संचालक लक्ष्मण पाटील, श्रीनिवास शेळके, संचालक युवराज जाधव, आनंद पाटील, तुकाराम गोडसे, सुभाष घोडके, बळवंत पाटील, अनिल पाटील, सुभाष देशमुख, शिवाजी देशमुख, प्रा. सचिन सूर्यवंशी, डॉ. बालाजी वाघमारे, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे, आनंद मालू, भालचंद्र पाटील, अशोक अग्रवाल, अशोक लोया, तुळशीराम गंभीरे, सुरेश धानुरे, रज्जाक शेख, दिनकर मोरे, राजू मुंदडा अंमर पवार, भालचंद्र दानाइ,भारत टोंपे, अरुणा मोरे, वेणुबाई आदमाने, सहाय्यक सचिव भास्कर शिंदे, गणेश रुकमे, दीपक पाटील, विनोद नखाते, राम शिंदे, पत्रकार हरिराम कुलकर्णी यांच्या सह लातूर तालुक्यातील सोसायटीचे अध्यक्ष सरपंच शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे सचिव अरंिवद पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन बालाजी कीसवे यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक युवराज जाधव यांनी मांडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR