नांदेड : अति उष्णतेचे गंभीर परिणाम होत आहेत. शहरातील बाबानगर, परिसरात घरासमोर ठेवलेली ईव्ही बाईक अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडलेल्या घटनेत सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.
सध्या निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. याच उष्णतेचा फटका ईव्ही बाईक आणि अन्य वाहनांना बसत आहे. इंजिन अति गरम होऊन वाहने पेट घेत आहेत. शहरातील बाबानगर तथा राजेंद्रनगर भागात शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घरासमोर ठेवलेल्या एका ईव्ही बाईकला आग लागली. अवघ्या काही वेळात आगीचा भडका उडाला.घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. परंतू तोपर्यंत ही बाईक जळून खाक झाली.
















