Homeलातूरबाभळगावचे सुपुत्र शाम देशमुख यांचे कार्य प्रेरणादायी

बाभळगावचे सुपुत्र शाम देशमुख यांचे कार्य प्रेरणादायी

लातूर : प्रतिनिधी
बाभळगावचे सुपुत्र म्हणून शाम देशमुख यांनी आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी समाजासाठी आणि गावाच्या विकासासाठी अविरतपणे कार्य करीत राहावे. गावातील राजकारणात त्यांनी जो सकारात्मक आणि आदर्शवत दृष्टिकोन ठेवला, तो आम्ही जवळून पाहिलेला आहे. महाविद्यालयात त्यांनी कार्यालयीन अधीक्षक म्हणून बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे. म्हणूनच त्यांचा एवढा मोठा गौरव समारंभ होतो आहे. या प्रदीर्घ सेवेतून समाजाला दिशा मिळेल, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
           दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथे कार्यरत असलेले कार्यालयीन अधीक्षक शाम देशमुख यांचा सेवा गौरव कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, ट्वेंटीवन शुगर लिमिटेडचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, दयानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव शहाजीराव मुळे, प्राचार्य डॉ. राम वाघ, संस्थेचे उपाध्यक्ष नरसिंह देशमुख, सहसचिव महादेव जटाळ, कोषाध्यक्ष आयुब शेख, संचालक सुवर्णाताई मुळे, भीमराव शिंदे, सूर्यकांत देशमुख, मारुती मस्के यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगावच्या वतीने चालत असलेल्या विद्याशाखेचे आजी माजी मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने सपत्नीक सन्मानचिन्ह आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन शाम देशमुख यांना देऊन सेवागौरव करण्यात आला. यावेळी शंकर नागरी सहकारी बँक नांदेडचे संचालक भास्करराव तरोडेकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन व सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले तर सन्मानपत्राचे वाचन डॉ. जयदेवी पवार यांनी केले. डॉ. नरेंद्र देशमुख, डॉ. सुरेशकुमार कांबळे, डॉ. दशरथ भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. रणजीत जाधव यांनी केले. आभार डॉ. शाहूराज मुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टाफ सचिव प्रा. चंद्रकांत मोरे, प्रा.विवेक कदम, बाळासाहेब देशमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR