लातूर : प्रतिनिधी
बळीराजाच्या कुटुंबातील सदस्य प्रमाणे शेतात राबणा-या सर्जा- राजा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा होय. त्यानिमित्त बाभळगाव येथील गुरुवारी देशमुख यांच्या गढीवर बळीराजाचा खरा सोबती असलेल्या सर्जा-राजाचा बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला असून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांची विधीवत पूजा केली.
माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी गावातील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना बैलपोळा सणानिमित्त शुभेछा दिल्या. गावातील बैलपोळा सणानिमित्त निघालेल्या मिरवणुका बघण्यासाठी स्वत: माजी मंत्री दिलीपराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख यांच्यासह ग्रामस्थ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी लातूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष महादेव देशमुख, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन महादेव जटाळ, माणिक सगर, अविनाश देशमुख, पोलिस पाटील मुक्ताराम पिटले यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















