बारामतीत सुनेत्रा पवार विजयी; देशात सर्वाधिक मताधिक्याचा रचला इतिहास

- Advertisement -

पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विजयाकडे मोठी झेप घेतली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी कामगिरी करत माजी आमदार अजित पवार यांच्या २०१९ मधील मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड मोडीत नवा रेकॉर्ड बनवला आहे. २४ च्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय झाला आहे.

सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने आज झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, जय पवार आणि पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडणून देण्याचं आवाहन केलं होतं, त्याचबरोबर सर्व पक्षांनी आणि संघटनांनी देखील सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला होता, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवाराला हजारापेक्षा जास्त मते देखील पडली नसल्याचं दिसून येत आहे. करूणा मुंडे यांना १२५ मते मिळाली आहेत, तर अभिजित बिचुकले यांना १२१ मते मिळाली आहेत.

अजित दादांचा विक्रम मोडला
बारामती पोट निवडणुकीतील सर्व मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना मिळालेले हे मताधिक्य आतापर्यंत देशातील सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे २०२२ साली २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजयी झाले होते. सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला आहे, असं सांगितलं जात आहेत.

आज आनंदाचा दिवस :पार्थ पवार
सुनेत्रा पवारांना मिळालेल्या विजयानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना पार्थ पवार म्हणाले की, आज रेकॉर्ड मताने निवडून आलो त्यांचे आभार. निवडणुकीला सामोरे जावे लागेल असे वाटले नव्हते. आम्हाला कुणालाही वाटत नाही आज आनंदाचा दिवस आहे. कुणीही जल्लोष करू नये. 2029 ची तयारी नाही. मी इथे लोकांसाठी असेल, जनता दरबार घेईल. आचारसंहिता संपल्यावर मी जनता दरबार घेईल, अशी माहिती देखील पार्थ पवारांनी दिली आहे.

भारतातील सर्वाधिक मताधिक्य असलेले काही प्रमुख आमदार

सुनील कुमार शर्मा — साहिबाबाद (उत्तर प्रदेश) — २,१४,८३४ — २०२२
पंकज सिंह — नोएडा (उत्तर प्रदेश) — १,८१,५१३ — २०२२
अजित पवार — बारामती (महाराष्ट्र) — १,६५,२६५ — २०१९
काशीराम पावरा — शिरपूर (महाराष्ट्र) — १,४५,४४४ — २०१४

बारामतीकरांचे मन:पूर्वक आभार : सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया

बारामतीकरांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित आहे, असं सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर बारामतीकरांचे मन:पूर्वक आभार मानतानाच हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची..! असं म्हणत सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीकरांना विकासाचा विश्वास दिला आहे. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी ‘एक्स’ वर ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या वर्षी सोडलं जग

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46
Video thumbnail
लातूरच्या RCC क्लासवर CBI ची पुन्हा कारवाई; संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
03:44
Video thumbnail
NTA समिती बरखास्त करा आणि RCC क्लासेसचे शुल्क परत करा; संतप्त लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
04:08
Video thumbnail
नीट प्रकरणी लातुरातून दोन विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी, गुरुवारी पुण्यात हजर राहण्याचे आदेश1
04:08
Video thumbnail
मुक्कामी बसच्या प्रवाशांना अंधाराचा सामना; तावशीगड येथील मुख्य चौकात 'बत्ती गुल'!
01:51
Video thumbnail
MNS PROTEST|लातूर : RCC क्लासेसवर मनसेचे अंडेफेक आंदोलन
01:09
Video thumbnail
RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर अभाविप आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाचा ईशारा
02:51
Video thumbnail
कर्नाटकात दुर्घटना! दुबारे कॅम्पमध्ये दोन हत्तींमध्ये थरारक झुंज; ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू
00:23
Video thumbnail
प्रा. मोटेगावकरांच्या अटकेमागे 'हा' व्हिडिओ कारणीभूत; तपासाला वेग.
01:00
Video thumbnail
Shivraj Motegavkar Arrest|प्रा. शिवराज मोटेगावकरांना १० दिवसांची CBI कोठडी;ईडीचीही एन्ट्री
02:45
Video thumbnail
Shivsena Protest|NEET पेपरफुटीवर शिवसेना आक्रमक;RCC क्लासेसवर शिवसेनेकडून शाहीफेक
03:33
Video thumbnail
Latur|पिक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक;विमा कंपनी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव
06:11