Homeमहाराष्ट्रबारामतीत सेफ्टी टँकचा स्फोट; महिलेसह दोन मुली जखमी

बारामतीत सेफ्टी टँकचा स्फोट; महिलेसह दोन मुली जखमी

बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील कसबा परिसरातील साठेनगर येथे सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २३) रात्री घडली आहे. या दुर्घटनेत एक महिला आणि दोन लहान मुले गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सेफ्टी टँकची नियमित साफसफाई न झाल्याने त्यात ज्वलनशील वायू साचून हा स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे, नगरसेवक सुनील सस्ते यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली.

दरम्यान, युवानेते युगेंद्र पवार यांनीदेखील तत्काळ घटनास्थळी भेट देत घडलेल्या घटनेची माहिती घेतली, तसेच त्यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस करत डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR