नागपूर : प्रतिनिधी
सर्वांचंच लक्ष बारामतीतकडं लागले आहे. काँग्रेसचा उमेदवार आपला अर्ज मागे घेईल की नाही याबाबत तर्क लढवले जात असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचा उमेदवार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार अर्ज माघारी घेतील, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर बुधवारी काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांची चर्चा झाली. अनेकांनी या संदर्भातील सकारात्मक भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत कळवली आहे. माघार घेतली पाहिजे, अशीच अनेकांची भूमिका आहे. आता प्रदेशाध्यक्ष सर्व नेत्यांची भावना काँग्रेसचे केंद्रीय श्रेष्ठींना कळवतील व त्यांच्या परवानगीने अर्ज मागे घेण्याचा निर्णय होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

