24.2 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeमहाराष्ट्रबारावी परीक्षेदरम्यान वाशिममध्ये सामूहिक कॉपी ; तब्बल ५८१ विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई

बारावी परीक्षेदरम्यान वाशिममध्ये सामूहिक कॉपी ; तब्बल ५८१ विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई

वाशिम : वाशिमच्या टो येथील मैनागिरी विद्यालयात बारावीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून तब्बल ५८१ विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली आहे. भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांकडून हा सामूहिक कॉपीचा प्रकार घडला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकत ही मोठी कारवाई केली आहे.

दरम्यान, आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. तर शिक्षण विभागाने कारवाई संदर्भातील अहवाल वाशिमच्या जिल्हाधिका-यांकडे पाठवला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांसह ५० हून अधिक कर्मचा-यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.

वाशिम जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रकार घडल्याच्या सातत्याने घटना समोर आल्या आहेत. कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यानंतर आता थेट शिक्षकच कारवाईच्या रडारवर आले आहेत. वाशिम जिल्ह्यात विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांकडून कॉपी होत असल्याचे प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनाने जबाबदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अमरावती येथील उपशिक्षण संचालकांना पत्र पाठवत ५ केंद्र संचालक, २ सहायक केंद्र संचालक आणि १४ पर्यवेक्षक अशा एकूण २१ कर्मचा-यांवर कारवाईची शिफारस केली आहे. बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्या पेपरपासून कॉपीमुक्त अभियान अंतर्गत भरारी पथकांनी धाडी टाकताच अनेक केंद्रांवर कारवाई केल्याने परीक्षा व्यवस्थापनातील त्रुटी स्पष्ट झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR