पॅरिस : झेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रेयचिकोव्हा आणि इटलीची जास्मीन पाओलिनी यांच्यात विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीची फायनल रंगली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत बार्बोराने शानदार विजय मिळवित ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. जास्मीनला फ्रेंच ओपननंतर २०२४ मध्ये सलग दुस-यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बार्बोराने २०२१ मध्ये फे्रंच ओपनमध्ये एकेरीचे जेतेपद पटकावले होते. आज तिने दुस-यांदा ग्रँडस्लॅमवर नाव कोरले.
पहिला सेट बार्बोराने ६-२ असा सहज जिंकला परंतु २०२१ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या विजेत्या खेळाडूला कडवी टक्कर मिळाली. २८ वर्षीय जास्मीनने जबरदस्त पुनरागमन करीत दुसरा सेट ६-२ ने जिंकला. तिस-या सेटमध्ये बार्बोराने आघाडी घेतली. मात्र जास्मानने कडवी झुंज दिली. परंतु बार्बोराने अखेरच्या बाजी मारत दुस-यांदा ग्रँडस्लॅमवर आपले नाव कोरले.