23.2 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांचा मुलगा माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतो

बाळासाहेबांचा मुलगा माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतो

पुणे : प्रतिनिधी
ज्यावेळेस मी प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढण्याचे आंदोलन केले, त्यावेळी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढल्याच्या प्रकरणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाने माझ्या १७ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना तेव्हाचे होर्डिंग जर बघितले, तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना वाईट वाटेल म्हणून हिंदुहृदयसम्राट हे नावच काढून टाकले होते, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे बोलत होते. या राज्यात पाच वर्षांत जे राजकारण झाले ते कधीच कोणी पाहिले नसेल. या फोडाफोडीच्या राजकारणाचे संत शरद पवार असून त्यांनी जाती-जातीत भेदभाव करायला शिकवलं. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. राज्यातील जनतेसाठी माझी काही स्वप्नं आहेत. आजपर्यंत सगळ्यांना सत्ता दिली, मला एकदा राज्याची सत्ता देऊन बघा’, असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR