बिहारमध्ये महाआघाडीत पेच!

जागावाटपावर मतैक्य नाही, पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल
पाटणा : वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा संपला. परंतु महाआघाडीत जागावाटपाबाबत अद्याप एकमत झालेले नाही. जागावाटपावरून राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीआयपी यांच्यात वाद रंगला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनुकूल स्थिती असताना महाविकास आघाडीत जसा गोंधळ पाहायला मिळाला, त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये झाल्याचे चित्र आहे. जागावाटपाची घोषणा न होताच पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १२५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात राजदने ७२, काँग्रेसने २४, डावे २१, व्हीआयपीने ३ आणि आयआयपीने २ जागांसाठी अर्ज दाखल केले.

नामांकनाच्या पहिल्या टप्प्यात ४ जागांवर महाआघाडीचे उमेदवार एकमेकांसमोर आहेत. दोन्ही टप्प्यात महाआघाडीचे पक्ष १० जागांवर एकमेकांविरुद्ध लढत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांच्या ताब्यात असलेल्या जागेवर आरजेडीने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससाठी लोकप्रिय असलेल्या कुटुम्बा येथून प्रदेशाध्यक्ष राजेश राम हे उमेदवार आहेत. या जागेसाठी आरजेडीने त्यांचे नेते सुरेश पासवान यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, औरंगाबादमध्ये ५-६ जागांवर मैत्रीपूर्ण लढाईची तयारी सुरू आहे.

विकासशील इंसान पक्षाचे मुकेश साहनी आता १५ जागांवर समाधानी आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मध्यस्थीमुळे मार्ग निघाला. यात सीपीआय (एमएल) नेते दीपांकर भट्टाचार्य यांनीही वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, आता झामुमोने महाआघाडीची साथ सोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाआघाडीला धक्का बसला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही घोषणा केली.

एनडीएला धक्का
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला पहिला धक्का बसला. छपरा जिल्ह्यातील मढौरा विधानसभा मतदारसंघातील लोजपच्या उमेदवार सीमा सिंह यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. हा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने या जागेवर राजदविरुद्ध जनसुराज अशी लढत होईल. त्यामुळे एनडीएला धक्का बसला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news