30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये तरुणाला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

बीडमध्ये तरुणाला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी येथील एका हॉटेलमध्ये ४ जणांनी एका तरुणावर लोखंडी रॉड, चाकू व लाकडी काठ्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात ३२ वर्षीय नितीन लोंढे हा गंभीर जखमी झाला आहे.

त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान रोहित गायकवाड, शुभम लोंढे, आसिफ शेख व साहिल पठाण या चार जणांविरोधात शिरूर कासार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याचा अधिक तपास शिरूर कासार पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR