23.5 C
Latur
Thursday, January 15, 2026
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये भररस्त्यात आईसह मुलाला बेदम मारहाण

बीडमध्ये भररस्त्यात आईसह मुलाला बेदम मारहाण

बीड : प्रतिनिधी
जमिनीच्या किरकोळ वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या केज तालुक्यातील सांगवी गावात उघडकीस आला आहे. गावगुंडांनी संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात अमानुष मारहाण केली. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.

गंभीर जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अमानुष मारण्याचा व्हीडीओ मोबाईल कॅमे-यात कैद झाला असून मारहाण करणा-यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महिलेच्या कुटुंबाने केली आहे.

बीड जिल्ह्यातील केज येथे एका महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. जमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आली असून याआधी या गावगुंडांच्या विरोधात ५ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र तक्रार का नोंदवली म्हणत गावगुंडांनी महिलेची व तिच्या मुलाची रस्त्यात वाट अडवत मारहाण केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR