27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये शिंदेंच्या नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बीडमध्ये शिंदेंच्या नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे खळबळ

बीड : प्रतिनिधी
एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे बीड जिल्ह्यातील एकच खळबळ उडाली. उपतालुकाप्रमुख भारत तुळशीराम देवकते असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या नेत्याचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील ढेकणमोहा येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर बीडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत एकच खळबळ उडाली असून देवकतेंनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय का घेतला? याबाबत चर्चा सुरू आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे बीड जिल्ह्यातील उपतालुकाप्रमुख देवकते यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवणार होते; पण साडी तुटल्यामुळे ते खाली पडले अन् देवकते यांचा जीव वाचला. देवकते यांनी टोकाचे पाऊल उचलण्याआधी व्हॉट्सअ‍ॅप स्टेट­स ठेवले होते. त्या स्टेटसमधील नावांमुळे आणि माहितीमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची दखल बीडमधील शिवसेनेच्या नेत्यांकडून घेण्यात आली आहे. या प्रकाराची सखोल माहिती घेण्यात येत असून त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.

बीड जिल्ह्यातील ढेकणमोहा येथील देवकते यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भारत तुळशीराम देवकते यांनी झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र साडी फाटल्याने ते खाली पडले आणि त्यांचे प्राण वाचले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

आत्महत्येपूर्वी देवकते यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर चिठ्ठी आणि फोटो पोस्ट करत ‘दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र’ असा संदेश लिहिला. तसेच आपल्या मृत्यूसाठी गावचे सरपंच पती आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR