23.1 C
Latur
Friday, October 11, 2024
Homeमहाराष्ट्रबीड जिल्ह्यात हवाला रॅकेट!

बीड जिल्ह्यात हवाला रॅकेट!

बीड : प्रतिनिधी
बीड जिल्हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता चक्क हवालाच्या कामासाठीची मोठी रक्कम बीड पोलिसांनी जप्त केली. त्यामुळे बीडच्या व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. बीड पोलिसांनी तीन ठिकाणी छापा टाकून बीडमधून तब्बल ३२ लाख रुपयांची रोकड जप्त केली. बीड शहरात सुरु असलेल्या हवाला रॅकेटवर बीड ग्रामीण आणि बीड शहरच्या पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केली. या कारवाईत बीड शहरात ३ ठिकाणी छापे मारत यात हवालाची ३२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्यासोबतच हवाला रॅकेटसाठी वापरले जाणारे मोबाईल, यासह इतर साहित्यही जप्त केले.

बीडमध्ये हवाला रॅकेट कार्यरत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी संयुक्तपणे ही कारवाई केली. बीड शहराच्या कबाडगल्ली, डीपी रोड तसेच आणखी एकाठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली. त्यात तिन्ही ठिकाणाहून लाखो रुपये जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे हवाला रॅकेट चालवणा-यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR