नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टी-२० वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात झाली आहे. यावेळी भारत या स्पर्धेचे आयोजन करत आहे. टीम इंडिया डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून मैदानात उतरत असून पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. पण त्याआधी इंडियन टीमला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत सतत संघर्ष करावा लागत आहे. काहींना दुखापतींचा सामना करावा लागत आहे, तर काहींना आजारांचा सामना करावा लागत आहे. हर्षित राणा, वॉशिंग्टन आणि जसप्रीत बुमराह यांच्यानंतर, तरुण सलामीवीर अभिषेक शर्माचाही या यादीत समावेश झाला आहे.
शनिवारी भारतीय टीमने टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये आपल्या अभियानाची सुरुवात केली. पहिल्या सामन्यात इंडियन टीमचा सामना अमेरिकेसोबत झाला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत १६१ धावा केल्या. मात्र, अमेरिकेच्या डावादरम्यान, अभिषेकची तब्येत अचानक बिघडली. अमेरिकेच्या फलंदाजीच्या सुरुवातीला तो मैदानावर होता, त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले. यानंतर अभिषेक इतर खेळाडूंसोबत दिसला नाही.
सामन्यादरम्यान अभिषेकला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे दिसून आले, परंतु सामना संपल्यानंतर सत्य उघड झाले. कर्णधार सूर्यकुमार यादव याने याबद्दल सविस्तर माहिती दिली. ‘अभिषेक याची तब्येत बिघडली ज्यामुळे तो मैदानावर दिसला नाही. बुमराह याला सामन्याच्या सुरुवातीलात ताप आहे आणि अभिषेक याची देखील प्रकृती बिघडली आहे.
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अभिषेकच्या प्रकृतीबद्दल खुलासा केला. ओपनरच्या पोटात अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. ज्यामुळे त्याला मैदानातून बाहेर करण्यात आले. अभिषेकचे महत्त्व लक्षात घेता, त्याला पुन्हा मैदानात उतरवण्यात आले नाही. तर अभिषेक याच्या बदली क्षेत्ररक्षक म्हणून संजू सॅमसन मैदानात आला. पुढच्या सामन्यापर्यंत अभिषेक याची प्रकृती स्थिर होईल आणि तो त्याचा जलवा मैदानात दाखवेल. या विश्वचषकात अपेक्षेनुसार कामगिरी करता यावी म्हणून अभिषेक पुढील सामना खेळण्यास उत्सुक असेल असे देखील सिराज म्हणाला.

