Homeलातूरबु-हाणनगरमध्ये पाण्याची व्यवस्था; आश्वासनाची पूर्तता 

बु-हाणनगरमध्ये पाण्याची व्यवस्था; आश्वासनाची पूर्तता 

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणुकीत महाराणा प्रतापनगर जिल्हा परिषद गटातील बु-हाणनगर भागातील रहिवाशांना पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्याचे आश्वासन दिले होते. नव नियुक्त जिल्हा परिषद सदस्य महादेव मस्के यांनी बु-हाणनगरमध्ये बोअर पाडून पाण्याची व्यवस्था करुन आश्वासनाची पूर्तता केली आहे.
महाराणा प्रतापनगर जिल्हा परिषद गटातील ब-हाणनगरमधील स्थानिकांना गेल्या ३ ते ४ वर्षांपासून पाण्याअभावी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर या भागातील सर्व मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचादेखील निर्णय घेतला होता. मात्र यावेळी काँग्रेचे उमेदवार महादेव मस्के यांनी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती करून निवडणुकीनंतर कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था केली जाईल असा शब्द दिला.
तो शब्द माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनूसार महादेव मस्के यांनी पूर्ण केला. महादेव मस्के यांनी बु-हाणनगर भागात बोअर वेल घेतले असून ज्याला अडीच इंच इतके पाणीदेखील लागले आहे. महादेव मस्के यांच्या आश्वासनपूर्ती मुळे भागातील स्थानिक नागरिकांची पाण्याची अडचण दूर झाली असून यामुळे येथील जवळपास ५० कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव मस्के, पांडुरंग मस्के, तौफिक सय्यद, वाहिद सय्यद, मलिक शेख, ख्वॉजा शेख यांच्यासह या भागातील स्थानिक नागरिक उपस्थित  होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR