24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमनोरंजन‘बॉर्डर-२’ने पार केला २५० कोटींचा टप्पा

‘बॉर्डर-२’ने पार केला २५० कोटींचा टप्पा

देशभक्तीचा फॉर्म्युला पुन्हा हिट!

मुंबई : प्रतिनिधी
‘बॉर्डर २’ चे जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन २०० कोटींच्या पार झाले आहे. सनी देओलच्या चित्रपटाला विकेंडचा आणि प्रजासत्ताक दिनाचा खूप फायदा झालेला दिसला. चित्रपटाने ‘सिकंदर’ आणि ‘रेड २’ च्या एकूण कमाईला देखील मागे टाकले आहे.

सनी देओल स्टारर ‘बॉर्डर-२’ने बॉक्स ऑफिसवर उतरताच धुमाकूळ घातला आहे. निर्मात्यांनी या आठवड्यातच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट रिलीज केला आहे. त्यामुळे त्याचा फायदा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यासाठी होत आहे. रिलीज झाल्यापासून पहिल्या दोन दिवसेंतच तुफान कमाई करण्यात ‘बॉर्डर २ ’ यशस्वी ठरला. विकेंडला रविवारी कमाईची गती कायम राहिली. तर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा फायदा देखील चित्रपटाला झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, १९९७ चा वॉर ड्रामा बॉर्डरचा हा सीक्वेल आहे. ५१ कोटी रुपये तिस-या दिवसाची कमाई ठरली आहे. प्रत्येक तासाला कमाईचे आकडे वाढलेले दिसतात. प्रजासत्ताक दिनी जबरदस्त कमाई केली, देशांतर्गत ५९ कोटींहून अधिक रुपयांची कमाई चित्रपटाने केली आहे. ओपनिंग डेला ‘बॉर्डर २’ ने ३० कोटींचा गल्ला जमवला होता. दुस-या दिवशी बॉक्स ऑफिसवर ३६.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

पहिल्या दिवसाची कमाई पाहता आदित्य धरच्या ‘धुरंधर’ चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले. तर चौथ्या दिवशी ‘रेड-२’ आणि ‘सिकंदर’लाही ‘बॉर्डर’ने मागे टाकले आहे. रिलीजच्या अवघ्या चार दिवसांतच, युद्धपट ‘बॉर्डर २’ ने आंतरराष्ट्रीय स्तरावर २५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर पहिल्या आठवड्यात भारतात १८० कोटी रुपये कमाई केली आहे. सकाळचे अनेक शो रद्द होऊनही ‘बॉर्डर २’ ने चांगली सुरुवात केली होती. रविवारनंतर वर्ल्डवाईड मार्केटमध्ये चित्रपटाची कमाई ४.३ दशलक्ष डॉलर्सच्या आसपास पोहोचली आहे. यामुळे चार दिवसांनंतर चित्रपटाची वर्ल्डवाईड कमाई २५१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR