35.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeपरभणीबोलेरो- ट्रॅक्टर अपघातात ६ गंभीर जखमी

बोलेरो- ट्रॅक्टर अपघातात ६ गंभीर जखमी

ताडकळस : पुर्णा-ताडकळस राज्य मार्गावरील पुनकळस पाटी लगत दि. ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ऊसाचे ट्रॅक्टर व बोलेरो जीपमध्ये झालेल्या भिषण अपघातात ६ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पुर्णा-ताडकळस रस्त्याने नांदेड येथील प्रवाशी आपल्या बोलेरो जीपने सिरसम येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम संपल्यावर रात्री बोलेरो जीपने नांदेडकडे जात असतांना ताडकळस लगतच असलेल्या पुनकळस पाटीलगत उसाने भरलेल्या ट्रॅक्टर व बोलेरो जीपचा भिषण अपघाताची घटना घडली.

या घटनेत बोलेरो जीपमध्ये बसलेल्या पुर्णा येथील सुरेखा नागोराव भालेराव (वय ४२), कोमल नागोराव भालेराव (वय १४), भुषण राजकुमार भालेराव (वय ७), सुचिता सुखदेव चित्ते (वय १९), सरस्वती प्रभाकर हनमंते (वय ६०) राहणार नांदेड, सागरबाई पांडुरंग सावंत (वय ६०) राहणार हैद्राबाद हे जखमी झाले आहेत. अपघातातग्रस्तास नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR