सोलापूर : प्रतिनिधी
भगवान परशुराम जयंती महोत्सव समितीतर्फे मिरवणूक काढण्यात आली. परशुरामांचा जयघोष करत निघालेल्या मिरवणुकीत महिलांच्या ढोल व लेझीम पथकाने सगळ्यांचे लक्ष वेधले. यावेळी सहभागी झालेल्या समाज बांधवांनी भगवी टोपी आणि सदरा घातला होता. दरम्यान, चार हुतात्मा चौकात भगवान परशुराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले.
राजवाडे चौकातून सुरु झालेली ही मिरवणूक नवी पेठ, मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक मार्गे जाऊन चार पुतळा येथे विसर्जित झाली. त्याच ठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजता भगवान परशुरामांच्या मूर्तीची ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत आणि मंत्रोच्चारात प्रतिष्ठापना होऊन पूजन करण्यात आले. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मूर्ती त्याच ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनानंतर येणाऱ्या सर्व भाविकांना कैरीचे पन्हे आणि कैरीच्या डाळीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
याप्रसंगी गोविंद गवई, वैभव कामतकर, मुकुंद मुळेगावकर यांच्यासह पुरोहित आणि वेद प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मंत्रघोष केला. या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, राम तडवळकर, दत्तात्रय आराध्ये, निशिकांत खेडकर, वैभव कामतकर, राजन कामत, अमर कुलकर्णी, रोहिणी तडवळकर, रमण कुलकर्णी, अमृता गोसावी, रवी हलसगीकर, मानसी कुलकर्णी, डी.डी. कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, जयतीर्थ पडगानूर, नितीन कुलकर्णी, रवी हलसगीकर, देदीप्य वडापूरकर, सतीश पाटील, विजय कुलकर्णी, बजरंग कुलकर्णी, संपदा जोशी, प्रशांत जोशी यांच्यासह ब्राह्मण समाजातील महिला, युवक, नागरिक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.