मुंबई : प्रतिनिधी
दिवा येथे भटक्या कुर्त्याच्या चाव्याने एका ५ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिनाभर उपचार आणि चार इंजेक्शन दिल्यानंतरही तिची प्रकृती बिघडली. यामुळे उपचार पद्धतीवर आणि महापालिकेच्या डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर नातेवाईकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भटक्या कुर्त्यांच्या दहशतीमुळे नागरिकांत संताप असून, या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी होत आहे.
मुंबईसह अनेक शहरांतील रस्त्यांवर विविध ठिकाणी भटकी कुत्री फिरताना दिसतात. काही वेळा ती रस्त्यावर नुसती बसलेली असतात, पण बहुतांश वेळा या कर्ु्त्यांमुळे खूप तार्स होतो, त्याचा उपद्व वाढतो. येणा-या जाणा-या लोकांच्या अंगावर जाणं, बाईकच्या मागे भुंकत पळणे, लहान मुलांना चावणे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता दिव्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिव्यातील दिवाझ्रआगासन रोड बेडेकर नगर मध्ये एका ५ वर्षांच्या चिमुकलीला कुत्रा चावला आणि तिचा मृत्यू झाला.
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दिव्यात राहणारी ही ५वर्षांची निरागस मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र महिन्याभराच्या उपचारांनंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तिची तब्येत आणखी बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.

